Monday, November 2, 2009

मंगेश

माझी आणि मंगेशची पहिली भेट झाली ती January 2000 मध्ये, लिंगाणाच्या माथ्यावर. मंगेशचे fan following जबरदस्त ! मंगेशपण climb मध्ये जॉईन होणार आहे असे मी 10/15 दिवस ऐकत होतो, त्याच्याबद्दलचे किस्से ऐकत होतो आणि ते ऐकून मनात उत्सुकता होती कि कोण हा मंगेश ? त्याच्याशी भेट झाल्यावर खात्री पटली कि हा माणूस चर्चा करण्यासारखाच आहे. ट्रेकला वातावरण हलके -फुलके ठेवण्यात , फालतू jokes मारण्यात, काहीतरी भयंकर कोडी घालण्यात , रेडीओवरच्या जाहिराती (जश्याच्या -तश्या ) ऐकवण्यात , काहीतरी वेडेवाकडे शारीरिक प्रकार करण्यात , विचित्र नाचण्यात, मंगेशचा हात कोणी धरू शकत नाही . त्याच्या ह्या अशा चाळ्यांमुळे लोकांमध्ये त्याचे 1st impression काय होत असे याचा एक किस्सा . समीर सागवेकरची मंगेशशी ट्रेक मध्ये पहिल्यांदा ओळख झाली . पुण्यात आल्यावर , समीर पहिल्यांदा सहज मंगेशला भेटायला मंगेशच्या ऑफिस मध्ये गेला आणि तिथे त्याचा अवतार पाहून थक्क झाला . समीर मला म्हणाला “अरे , मंगेश एकदम मोठी हस्ती आहे यार , ऑफिस मध्ये मोठे स्वतंत्र कॅबीन आहे , हाताखाली काम करायला team वगैरे . मंगेशचे ट्रेक मधील चाळे आणि कार्टूनगिरी पाहून कधी वाटले नाही कि तो एवढ्या मोठ्या हुद्द्यावर काम करत असेल .”




ट्रेकमध्ये कोणी घाबरले , एखादी गोष्ट जमत नाही म्हणाले कि मंगेशचे ठरलेले वाक्य असायचे – “काळजी करू नकोस , तुला फुलासारखे घेऊन जाईन .” त्याप्रमाणेच तो करायचा , अशाने त्याने बऱ्याचजणांना motivate / inspire केले . एखादा अवघड टप्पा , rock patch किंवा climb आपण फ़क़्त मंगेशमुळे पार करू / चढू शकलो असे सांगणारे बरेचजण निघतील . त्या बरेच जणांचे ट्रेक पुढेही चालू राहण्याचे श्रेय मंगेशला आहे .

माझ्या वडिलांचा मृत्यू झाला तेव्हा मी रांगणा किल्ल्यापाशी होतो . मला लगेच ठाण्याला परत येणे क्रमप्राप्त होते ….मी मंगेशला फोने केला , मंगेशने तत्काळ “मी कोल्हापूरला येतो ” असे मला सांगितले . मी गाडी -रस्त्यापर्यंत पोहोचून , बसने कोल्हापूरला पोहोचण्याच्या आत , मंगेश कोल्हापूरला पोहोचला होता आणि त्याने मला निव्वळ अडीच तासात कोल्हापूरहून पुण्याला आणले , तेही रात्री 11.30 ला निघून . पुढे किरण /महेश बरोबर ठाण्याला आलो . मदत करण्यामध्ये मग ती आर्थिक असली तरी , मंगेश त्यात मागे -पुढे पाहत नसे . किंबहुना ‘नाही ’ म्हणणे त्याला जमत नसे .

मंगेशचा fitness अफाट होता . लो-भी , आहुपे -भीमाशंकर , भैरवगड -घनचक्कर -रतनगड -सांदण , देह्ने -रतनगड -देह्ने , असे Cross-Country ट्रेक्स कमीतकमी वेळात करणे आणि ट्रेक पूर्ण करून जेवण बनवणे किंवा गाडी चालवत पुण्याला घरी जाणे असले अचाट प्रकार तोच करू जाणे . खडा - पारशी , लिंगाणा , Duke’s Nose, कात्राबाई , तेल बैला (all 3 walls), पहिने नवरी असे बरेच कठीण climbs हि त्याने केले . “बाण ” climb करायचे त्याचे स्वप्न मात्र अपूर्ण राहिले . हातावर चालणे , कमान टाकणे , स्वत:च्या हाताची घडी करून त्यातून स्वत: उडी मारणे , असे आचरट पण शारीरिक क्षमतेचे कस पाहणारे प्रकार तो लीलया करायचा .

या सगळ्याचा अर्थ तो Perfect होता असेही नाही . तो कमालीचा हट्टी होता , भिडस्त होता . चूक ला तोंडावर चूक म्हणण्यास तो तयार नसे . माझे आणि त्याचे chat वर बऱ्याचवेळा वाजले आहे …..पण ते तेवढ्यापुरतेच , त्याचे पर्यावसन आम्ही कधीही कायमच्या भांडणात होऊ दिले नाही . आमचे नाते आहे हे आम्हाला खूप उशिरा कळले. नात्यापेक्षा , मैत्री जास्त घट्ट होती इतकी कि त्याने Marathon पूर्ण केली म्हणून मी त्याला भरपेट मासे आणि कोंबडी खायला घातली .

तो बऱ्याच संस्थांशी निगडीत होता , पण त्याचे चक्रमवर मनापासून प्रेम होते . आमच्यातील वादाचा हा हि एक विषय असे . मी त्याला म्हणायचो कि तुझ्या क्षमतेचा एकही जण चक्रम मध्ये नाही मग तू चक्रम बरोबरच Himalayan Expeditions करण्याचा अट्टाहास का करतोस ? तुला चक्रमच्या expeditions मध्ये हवा तसा back-up / support मिळणे मुश्कील आहे, Don’t you think you are wasting your energy, time & Money here ? याला त्याचे उत्तर, त्याच्याच शब्दात सांगायचे तर असे होते -

Mangesh: Sadhya mazi capacity far superior ahe - I agree
Mangesh: me swataha aarohak barobar 10 expd karu shaklo asto

ani you can ask shamangi te dur varshi mala phone kartat ye mhanoon - i would have liked to do Shivling, but i do it with chakram every year in spite of fact that mazya capacity che ithe kuni nahi
Mangesh: do you think chakram vachun lokanche kiwan lokan vachun chakram che adte
me: nahi
Mangesh: tari chakram barobar lok yetat ani dusri kade jaat nahit hyat sagle ale
Mangesh: people have some relations internally built

From : Mangesh1 mangeshgdeshpande@gmail.com
To : mahajan.rajendra@gmail.com
date : Fri, Feb 27, 2009 at 1:15 PM


वेगाचे जबरदस्त आकर्षण मंगेशला होते . गाडीत त्याच्या बाजूला बसलेला माणूस झोपणार नाही याची पुरेपूर काळजी त्याच्या गाडीचा वेग घेत असे . US मध्ये असताना त्याने 1500/2000 cc bikes चालवण्याचा course केला आणि त्याचे प्रात्यक्षिक मला ठाण्याच्या रस्त्यावर , माझ्या 100 cc बाइकवर, मला मागे बसवून , माझी फाxxxxx असताना , दाखवले .

सर्व गोष्टींमध्ये पुढे राहण्याबाबत मंगेश नेहमी जागरूक होता . तो अभ्यासात पुढे होता - Indian Institute of Science, Bangalore या नामांकित संस्थेमधून त्याने post-graduation केले . पुण्याहून मुंबईला येताना तो सगळ्यांना मागे टाकत एक तास चाळीस मिनिटात वगैरे मुलुंडला पोहोचायचा. ट्रेक मधेही मागची आघाडी आम्हा कोणावर तरी सोपवून तो सर्वात पुढे असायचा . आमच्यामध्ये Marathon धावून , पूर्ण करणाराही तोच पहिला . चक्रमचि हिमालयातील पहिली यशस्वी मोहीम (Chamser – Lumser Kangri) त्याच्याच नेतृत्वाखाली झाली आणि शिखरावर पोहोचणारा तोच पहिला .

परलोकी जाण्यामधेही आम्हा सर्वाना मागे टाकून , त्यानेच पहिला नंबर लावला .

- राजन महाजन


टीप :-
Oct 2009 मध्ये मंगेश देशपांडे आणि सेकर सदाशिवन यांचा Mt. Tingchenkhang हे शिखर सर करून खाली उतरत असताना अपघाती मृत्यू झाला . मंगेशला श्रद्धांजलीपर हे लेख -पुष्प अर्पण .